शेतकऱ्याला आर्थिक बाबतीत सबळ बनविणारा आणि एकात्मिक कार्यपद्दती असणारा प्रकल्प "एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प "हा फार्मर नेटवर्क कडून स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत राबविला जाणारा पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत प्रकल्प आहे .
एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे :
धरण शेजारी १ विहीर आणि प्रत्येक २० एकर क्षेत्रासाठी १ विहीर अशी पायाभूत सुविधा उभारली जाणार आहे . निर्मिती केलेल्या विहिरी एकमेकांना पाईप द्वारे जोडून सिंचनाचे जाळे उभारल्या जाणार आहे . याचाच अर्थ धरणाचे पाण्याचे वितरण हे मायक्रो लेवल होऊन प्रत्येक शेतकऱ्याची जमीन हि सिंचनाखाली येऊ शकणार आहे . यातून त्याचा आर्थिक विकास होऊ शकणार आहे .
आज भारतात शेती सिंचन व्यवस्था हि विकेंद्रित आणि स्वमालकी असणारी आहे . त्यामुळे सबळ श्रीमंत शेतकरी हि व्यवस्था उभारू शकतो आणि पाहिजे त्या पद्दतीने वापरू शकतो . याचा अप्रत्यक्षात परिणाम हा शेतीचा पोत खराब होण्यात होतो आहे . त्यात संबंधित शेतकऱ्याचे नुकसान होतेच परंतु सोबत सोबत देशाचे नुकसान होत आहे . एखादया सबळ शेतकऱ्याकडे सिंचन व्यवस्थापन असेल तो शेजारच्या शेतकऱ्याला शेतीच्या सिंचन करिता पाणी उपलब्ध करून देणार नाही . शिलकी पाण्याचा उपयोग हवा तसा करतो .हि कृती शेजारच्या शेतकऱ्याच्या मनात असूया निर्माण करते .त्यातून सतत दोन शेजारचा शेतकऱ्यांत वाद निर्माण होत राहतात .यात जमीन उपलब्ध आहे पंरतु सिंचन व्यवस्था उभी न करू शकल्यामुळे उत्पन्न वाढ होत नाही . यात देशाचे नुकसान होत आहे . आपल्याकडे उपलब्ध जमीन बघता आपण जगाचे पोशिंदे होण्याची ताकत होऊ शकतो परंतु आपला देश राजकारण्यांचा देश आहे .त्यामुळे प्रत्येक नागरिकाला वाटते आहे प्रत्येक बाब हि शासन व्यवस्थेने केले पाहिजे . यातच सगळे सामावले आहे . परंतु फार्मर नेटवर्क नि ठरवले आहे थोडी वेगळी वाट चोखाळू ,थोडी शेतकऱ्याची आत्मभावना जागवू यातून त्याची आर्थिक ताकत वाढेल . याच कृतीतून फार्मर नेटवर्क नि एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प राबविण्याचे नियोजन महाराष्ट्रात करावयाचे ठरविले आहे
१) धरण क्षेत्रात १ मोठ्या आकाराची विहीर निर्मिती करून त्यानंतर प्रत्येक २० एकर क्षेत्राकरिता पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत १ विहिरींची निर्मिती .
२) खोदल्या गेलेल्या विहिरी एकमेकांना पाईपलाईनच्या माध्यमातून जोडलया जाणार आहे त्यातून विहिरीच्या नेटवर्क चे जाळे निर्माण केल्या जाणार आहे
३) एक गाव संपले कि दुसऱ्या गावाच्या शेतजमिनी सिंचनाखाली आणण्याकरिता विहिरीच्या नेटवर्क चा विस्तार केल्या जाणार आहे .
४) व्यक्तिक शेतकऱ्याची गुंतवणुकीतून विहीर खोदल्यास पाणी न लागल्यास शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला जो धोका संभवतो या सिंचन नेटवर्क मुळे टाळल्या जाऊ शकतो .शिवाय सिंचन हमी मिळू शकणार .
५) सिंचन व्यवस्थेची निर्मिती झाल्यावर वितरण करण्याकरिता संगणकीय प्रणाली उभारलेल्या जाणार आहे . या प्रणाली मध्ये पिकाची नेमकी गरज बघता सिंचन करिता पाणी उपलब्ध केल्या जाणार आहे .
६) सिंचन व्यवस्था पायाभूत सुविधा निर्मिती झाल्यावर शेतकऱ्याला आपल्या मालकीच्या क्षेत्राकरिता ठिबक प्रणाली मध्ये गुंतवणूक करावयाची आहे . त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होणे शक्य होणार नाही .
७) पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्याला कोणतीही पायाभूत सुविधा निर्मिती करिता गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही .
८) सिंचन करिता पाणी हे शेतकऱ्याच्या बांध्यापर्यत उपलब्ध होणार आहे (नळयोजना पद्दत ) त्यापासून टॅपिंग करून शेतकऱ्याला आपल्या शेतात वितरण करण्याकरिता गुंतवणूक करावयाची आहे .
९) फार्मर नेटवर्क २४*७ सिंचन प्रणाली उभारण्याकरिता ५०० रुपये प्रतिमहिना प्रतिएकर अधिभार शेतकऱ्याकडून वसूल करणार आहे . यात पाण्याचे कोणतेही शुल्क असणार नाही आहे . हे फक्त पायाभूत सुविधा निर्मिती करिता गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक टप्प्यानीहाय वसूल करण्याकरिता घेतली जाणार आहे .
१०) शेतकऱ्यांकरिता सिंचन हमी मिळाल्यावर शेतकऱ्याचे उत्पनात वाढ होऊ शकणार आहे .
११) संगणकीय वितरण प्रणाली असल्यामुळे सिंचनाच्या पाण्याचा वापर काटेकोर होऊ शकणार आहे . आणि उपलब्ध पाणी अधिक क्षेत्राला पोहचू शकणार आहे .
१२) विहीर आणि अन्य पायाभूत सुविधा मधील गुंतवणूक हि स्थायी असल्यामुळे आणि मिळणारा परतावा हा १८% असू शकणारा असल्यामुळे आणि गुंतवणूक मधील धोका हा ०% असल्यामुळे अनेक गुंतवणूक कंपन्या पुढे येऊ शकणार आहे . यातून पायाभूत सुविधा निर्मिती विस्तार हा झपाट्याने होऊ शकणार आहे .
१३) सिंचन प्रणाली आणि वितरण प्रकल्प लागू झाल्यास गावातील शिक्षित तरुण ,गावातले शेतमजूर परत शेतीकामकाजाकडे वळू शकतात यातून आज शहराकडे होणारे स्थलांतरण थांबू शकणार आहे . आणि गावातील बुद्धिमत्ता ,गुणवत्ता आणि गावातील जवानी गावाच्या विकासाकरिता कामी पडू शकणार आहे
१४) प्रकल्पामुळे शहरातील झोपडंपट्टी आणि त्यातून येणारा बकालपणा आणि गुन्हेगारी कमी होऊ शकणार आहे .
१५)"गावाकडे चला"हे गांधीजींचे म्हणणे प्रत्यक्षात येऊ शकणार.
१) सामान्य अल्प भूधारक शेतकरी इच्छा असून सुद्धा आयुष्यभर सिंचन व्यवस्था उभारू शकत नाही .
२) विहीर खोदली आणि पाणी नाही लागले ,बोअरवेल घेतली आणि कोरडी गेली .हा सिंचन व्यवस्थेचा धोका टाळण्यासाठी .
३) कायमस्वरूपी आणि २४*७ उपलब्ध असणारी संगणकीय प्रणाली द्वारा संचालित असणारी पाणी वितरण पद्दत उभारणी साठी .
४) धरणाच्या पाण्याचा जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त लागवड क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी .
५) वारेमाप पाण्याचा वापर होऊन जमिनीची झीज होते आहे ती पूर्णपणे थांबवून उत्पादन वाढवण्यासाठी ..
१)विहिरीला /बोअर ला पाणी नाही लागले तर ?असणारा संभाव्य आर्थिक धोका या नेटवर्क मुळे असणारा नाही .
२) पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत प्रकल्प असल्यामुळे पायाभूत सुविधा करिता कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही .
३) संपूर्ण सिंचन प्रणाली उभारणी झाल्यावर शेतकऱ्याला आपल्या मालकीच्या क्षेत्रांवर ठिबक सिंचन प्रणाली करिता गुंतवणूक करावयाची आहे .त्यामुळे शेतकऱ्याची कोणत्याही पातळीवर गुंतवणूक होऊ शकणार नाही .
४)आर्थिक सबळ तसेच अल्प भूधारक शेतकऱ्याला एकसमान पातळीवर आणणारा हा प्रकल्प आहे . म्हणजेच कोठेही असूया /मस्सर /हीनभावना शेतकऱ्याच्या मनात येणार नाही .त्यामुळे गावातील तंटे राजकारण पासून निर्मित होणाऱ्या समस्या पूर्णपणे थांबू शकणार आहे .
५) प्रकल्पामुळे पाईप इंडस्ट्री ,विद्युत मोटार बनविणारी कंपनी ,आणि खोदाई मशीन तयार करणारी कंपनी याची बाजारातील मागणी वाढून याना सुगीचे दिवस येऊ शकणार आहे .
६) शेतकऱ्याचे सिंचन प्रणालीमुळे उत्पादन वाढले तर सर्व शेतीकामकाज मधील काम करणारे मार्केटिंग घटक याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ शकणार .याचाच अर्थ देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा वाढू शकणारा आहे .
७) शेतकऱ्याच्या मुलाला शेतीतच रोजगार मिळू शकणार
फार्मर नेटवर्क ची शेतकऱ्याकडून अपेक्षा आणि शेतकऱ्यांसाठी असणारे नियम आणि अटी
१) पायाभूत सुविधा निर्मिती म्हणून लागणारी विहिरींची जागा सर्वे झाल्यावर आणि जागेची निवड फिक्स झाल्यावर त्या २० गुंठे जागेचा भाव हा बाजारभावापेक्षा जास्तीचा नसावा .
२) विहिरीचे नेटवर्क उभारणी करताना पाईपलाईन करिता लागणारी जागा निशुल्क देण्यात यावी .
३) नेटवर्क उभारणी करताना कोणत्याही कारणाकरिता जाणीवपूर्वक अडवणूक करू नये .
४) विहिरींपर्यंत जाण्यायेण्यासाठी पायवाट निश्चित करून देणे .
५) संगणकीय प्रणाली असल्यामुळे पिकाचे नियोजन करण्यापूर्वी फार्मर नेटवर्क च्या शेतकरी मित्राला कळविणे गरजेचे असणार आहे .
६) पायाभूत सुविधा हि शेती आणि शेतकऱ्याच्या सुविधा करता आहे त्यामुळे त्याची सुरक्षा सुद्धा संबंधित शेतकऱ्याची असणार आहे .
प्रकल्प राबविण्याच्या अगोदर शेतकऱ्यांसोबत राबविला जाणारा प्रकल्प संबधी असलेली माहिती शेतकऱ्यांसोबत शेअर केली जाणार आहे . त्यामध्ये विहीर निर्मितीचा खर्च ,ज्या शेतात विहीर खोदल्या जाणार आहे त्या शेतकऱ्याची माहिती ,ती जागा शेतकऱ्यांनी विकत दिली याची खरेदी पत्र , त्या विहिरीच्या लाभक्षेत्रात येणारे अन्य शेतकऱ्याच्या नावाची यादी असू शकणार आहे .
7) ज्या शेतकऱ्याच्या शेतातून बंदिस्त पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी दिलेली परवानगी आणि संबंधित क्षेत्राचे नेमके लोकेशन याचा नकाशा याचा समावेश असणार आहे .
8)१० गुंठे क्षेत्रात शेततळे उभारून विहीर हि स्वयंपूर्ण करण्याचा फार्मर नेटवर्क चा मानस आहे
9)तळ्याचे क्षेत्र हे सोलर विदुयत निर्मिती करणाऱ्या कंपनीला विनामूल्ये देऊन त्यांना विद्युत निर्मिती करण्याकरिता गुंतवणूक करणार आहे .आणि निर्मित विद्युत हि विहिरीचे मोटार पंप ,गावाची गरज आणि अन्य शेतमालावर पक्रिया करण्याकरिता विकत घेतली जाणार आहे .
१0)प्रकल्प अमलबजावणी मध्ये लागणारा प्रकल्पाचा आर्थिक अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट )असणार आहे .
१1)प्रत्येक विहिरीमध्ये नेमके कोण आणि कोणत्या पातळीवर गुंतवणूक करणार आहे . याची माहिती असणार आहे . थोडक्यात पी.पी.पी. मॉडेल मध्ये पार्टनर कोण आहे याची माहिती पारदर्शी दिली जाणार आहे .
१2)प्रकल्प अहवाल मध्ये पी.पी.पी. मॉडेल मधील प्रत्येक गुंतवणूक कोण करणार आणि गुंतवणूक रक्कम नेमकी कशाकरिता खर्च करणार आहे या संबधी माहिती असणार आहे .
१3)शेतकऱ्याकडून सिंचन व्यवस्थेकरिता पायाभूत सुविधा अधिभार केल्या जाणार आहे याचे वाटप पी.पी.पी. पार्टनरला कसे होणार आहे याची माहिती असणार आहे . आणि हि सर्व माहिती फार्मर नेटवर्क च्या वेबसाइटवर गुंतवणूक योजना या वेबपेज वर दिसू शकणार आहे
१) पायाभूत सुविधा निर्मिती झाल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या लागवड क्षेत्रावर ठिबक प्रणाली उभारणी बंधनकारक असणार आहे .
२) सिंचन प्रणाली वापर करण्याअगोदर सुरवातीला १ वर्षाचे पॆसे ठेव म्हणून ठेवावे लागेल .
३) महिन्याच्या सुरवातीला मासिक ५०० रुपये प्रमाणे सिंचन अधिभार भरावाच लागेल .
४)नैसर्गिक आपत्ती जनक परिस्तिथिती उदभवल्यास आणि सिंचन करण्याकरिता पाण्याची अडचण जाणवल्यास एक्स्पर्ट लोक सुचवतील ते पीक लावणे गरजेचे असणार नाही . जर शेतकऱ्याला अडचण जाणवत असेल तर शेतकरी रिस्क घेऊन हवे ते पीक घेऊ शकणार आहे .
१) जेसीबी ,मशीन बनविणारी कंपनी .
२) पाईप निर्मिती करणारी कंपनी
३) ठिबक प्रणाली चे कामकाज करणारी कंपनी
४) विद्युत मोटार निर्मिती करणारी कंपनी
५) उत्पादन वाढल्यास शेतीकामकाज मधील काम करणारे मार्केटिंग घटक
फार्मर नेटवर्क संचलित "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प " अंतर्गत महाराष्ट्रातील १० गावात पथदर्शी (मॉडेल ) म्हणून संकल्पना प्रत्यक्षात राबविणार आहे .त्या गावाचा सर्व रिपोर्ट आणि शेतकऱ्यांना आणि शेतकरी मित्रांना प्रकल्प बाबत एक ठोबळ नियोजन करण्याकरिता फार्मर नेटवर्क १० गावाच्या बाबतीत अमंलबजावणी करणार येत असलेल्या गावाचा तांत्रिक आणि आर्थिक आढावा आहे हा आढावा एक ढोबळ आहे आणि हा बँकेबल प्रोजेक्ट अहवाल नाही आहे . हि स्पष्ट करत आहोत जेणेकरून चुका काढण्याच्या एक्स्पर्ट च्या सवयीने कोणताही शंका ,कुशंकांना वाव मिळू नये . फार्मर नेटवर्क नि विदर्भातील बुलढाणा जिल्हातील मेहकर तालुका अंतर्गत १० गावे या करिता निवडलेली आहे .जेणेकरून एक मागासलेले जिल्हात एक उदाहरण स्थापित करता येईल कि गावाच्या विकासाकरिता शेती आणि शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे . एकदा शेतकरी स्वयंपूर्ण झाला म्हणजे गावाचे कर संकलन वाढून सिमेंट रोड आणि गावात हव्या असतील त्या सुविधा निर्माण होऊ शकतात .त्या करिता केंद्रसरकार च्या व अथवा राज्य सरकारची मदतिची गरज पडता कामा नये . फार्मर नेटवर्क चे स्पष्ट मत आहे कि आगामी काळात या गावातील प्रकल्प हे एक आदर्श प्रकल्प म्हणून ओळखल्या जातील आणि हे गावे भारतात नव्हे आशियातील सर्वात श्रीमंत गावे म्हणून नावा रुपाला येतील .
१) शेतकरी मित्रांना आपल्या १० गावाची निवड करताना आणि पायाभूत सुविधा करिता नेमका किती खर्च आणि नेमका रूट बाबत निर्णय करताना सुलभ जावे
२) संबंधित गावातील सिंचन व्यवस्था करता आवश्यक असणारा सर्वे करणे आणि कोठे पाणी लागू शकेल याची शक्यता गृहीत धरून संबंधित शेतकऱ्यांना जागा विकत देण्याबाबत विनंती करणे सोपे जावे .
३) नेमका कोठे संगणक प्रणाली उभारणी करावयाची या करिता जागा नक्की करणे .
| गावाची नावे | एकूण लागवड क्षेत्र | लोकसंख्या | पिनकोड |
|---|---|---|---|
| कळमेश्वर | 3400 | 4917 | 443304 |
| थार | 1680 | 1256 | 443304 |
| खुदानापूर | 712 | 118 | 443304 |
| सारशीव | 1047 | 989 | 443304 |
| सुळा | 1357 | 434 | 443304 |
| हिवरा खुर्द | 5962 | 4055 | 443304 |
| देलप | 534 | 18 | 443304 |
| घुटी | 738 | 738 | 443304 |
| पारडी | 630 | 1091 | 443304 |
| मुंदेफळ | 883 | 1683 | 443304 |
| एकूण | 16943 | 15299 |
| # | सहभागी गावे | 10 |
|---|---|---|
| 1 | सहभागी गावाचे एकूण लागवड क्षेत्र | 16943 |
| 2 | सहभागी गावाची एकूण लोकसंख्या | 15299 |
| 3 | नियोजित २० एकर १ विहीर प्रमाणे विहिरींची एकूण संख्या | 850 |
| 6 | प्रकल्पाचा एकूण खर्च | 5695 |
| 7 | ३० % बँक मार्जिन रक्कम | 1708.5 |
| 8 | बँक कर्ज | 3986.5 |
| 9 | फार्मर नेटवर्क गुंतवणूक वाटा | 2107.15 |
| 10 | गुंतवणूक दाराचे भांडवली वाटा | 3587.85 |
| # | विवरण | अनुमानित खर्च रक्कम (रुपये ) |
|---|---|---|
| 1 | विहिरीची जागा (२० गुंठे ) | 150000 |
| 2 | खोदाई आणि बांधकाम | 350000 |
| 3 | विद्युत व्यवस्था आणि खोली बांधकाम | 50000 |
| 4 | नेटवर्किंग विहीर ते विहीर | 73000 |
| 5 | किरकोळ खर्च | 47000 |
| 6 | एकूण | 670000 |
| गावाची नावे | एकूण लागवड क्षेत्र | विहिरींची संख्या | विहिरींची एकूण रक्कम |
|---|---|---|---|
| कळमेश्वर | 3400 | 170 | 1139 |
| थार | 1680 | 84 | 563 |
| खुदानापूर | 712 | 36 | 242 |
| सारशीव | 1047 | 53 | 356 |
| सुळा | 1357 | 68 | 456 |
| हिवरा खुर्द | 5962 | 299 | 2003.3 |
| देलप | 534 | 27 | 180.9 |
| घुटी | 738 | 37 | 247.9 |
| पारडी | 630 | 32 | 214.4 |
| मुंदेफळ | 883 | 44 | 294.8 |
फार्मर नेटवर्क आपल्या स्वगुंतवणूक म्हणून एकूण प्रकल्प किमतीच्या ३७% रक्कम विहिरींची जागा ,आणि विद्युतीकरण या मध्ये गुंतवणूक करणार आहे .तर गुंतवणूक पार्टनर प्रकल्प किमतीच्या ६३% गुंतवणूक करणार आहे
| गावाची नावे | विहिरींची संख्या | एकूण गुंतवणूक रक्कम | फार्मर नेटवर्क ३७% गुंतवणूक | गुंतवणूक पार्टनर ६३% गुंतवणूक |
|---|---|---|---|---|
| कळमेश्वर | 170 | 1139 | 421.43 | 717.57 |
| थार | 84 | 562.8 | 208.226 | 354.564 |
| खुदानापूर | 36 | 241.2 | 89.244 | 151.956 |
| सारशीव | 53 | 355.1 | 131.387 | 223.713 |
| सुळा | 68 | 455.6 | 168.572 | 287.028 |
| हिवरा खुर्द | 299 | 2003.3 | 741.221 | 1262.079 |
| देलप | 27 | 180.9 | 66.933 | 113.967 |
| घुटी | 37 | 247.9 | 91.723 | 156.177 |
| पारडी | 32 | 214.4 | 79.328 | 135.072 |
| मुंदेफळ | 44 | 294.8 | 109.076 | 185.724 |
| एकूण | 850 | 5695 | 2107.15 | 3587.85 |
फार्मर नेटवर्क आणि गुंतवणूक पार्टनर प्रकल्पाला लागणारी मार्जिन रक्कम हि सुद्धा वेगळी प्रॉपर्टी तारण ठेवून कर्ज स्वरूपात उचलणार आहे . .
| गावाची नावे | विहिरींची संख्या | फार्मर नेटवर्क वाट ३७% | बँक मार्जिन रक्कम ३०% | बँक कर्ज रक्कम ७०% |
|---|---|---|---|---|
| कळमेश्वर | 170 | 421.43 | 126.429 | 295.001 |
| थार | 84 | 208.236 | 62.4708 | 145.7652 |
| खुदानापूर | 36 | 89.244 | 26.7732 | 62.4708 |
| सारशीव | 53 | 131.387 | 39.4161 | 91.9709 |
| सुळा | 68 | 168.572 | 50.5716 | 118.0004 |
| हिवरा खुर्द | 299 | 741.221 | 222.3663 | 518.8547 |
| देलप | 27 | 66.933 | 20.0799 | 46.8531 |
| घुटी | 37 | 91.723 | 27.5169 | 64.2061 |
| पारडी | 32 | 79.328 | 23.7984 | 55.5296 |
| मुंदेफळ | 44 | 109.076 | 32.7228 | 76.3532 |
| एकूण | 850 | 2107.15 | 632.145 | 1475.005 |
| गावाची नावे | विहिरींची संख्या | गुंतवणूक पार्टनर ६३% गुंतवणूक | बँक मार्जिन रक्कम ३०% | बँक कर्ज रक्कम ७०% |
|---|---|---|---|---|
| कळमेश्वर | 170 | 717.57 | 215.271 | 502.299 |
| थार | 84 | 354.564 | 106.3692 | 248.1948 |
| खुदानापूर | 36 | 151.956 | 45.5868 | 106.3692 |
| सारशीव | 53 | 223.713 | 67.1139 | 156.5991 |
| सुळा | 68 | 287.028 | 86.1084 | 200.9196 |
| हिवरा खुर्द | 299 | 1262.079 | 378.6237 | 883.4553 |
| देलप | 27 | 113.967 | 34.1901 | 79.7769 |
| घुटी | 37 | 156.177 | 46.8531 | 109.3239 |
| पारडी | 32 | 135.072 | 40.5216 | 94.5504 |
| मुंदेफळ | 44 | 185.724 | 55.7172 | 130.0068 |
| एकूण | 850 | 3587.85 | 1076.355 | 2511.495 |
| # | विवरण | गुंतवणूक रक्कम |
|---|---|---|
| 1 | एकूण प्रकल्पाचे बजेट | 5695 |
| 2 | बँक मार्जिन रक्कम | 1708.5 |
| 3 | बँक कर्ज रक्कम | 3986.5 |
| 4 | फार्मर नेटवर्क चा बँक मार्जिन रक्कमेतील ३०% रक्कम | 632.145 |
| 5 | गुंतवणूक पार्टनर चा बँक मार्जिन रक्कमेचा ३०% रक्कम | 1076.355 |
फार्मर नेटवर्क चा प्रकल्पामधील गुंतवणूक ३७% प्रमाणे वाट्यावर येणारी बँक मार्जिन रक्कम
| # | विवरण | गुंतवणूक रक्कम |
|---|---|---|
| 1 | बँक मार्जिन रक्कम (30%) | 189.6435 |
| 2 | बँक कर्ज रक्कम | 442.5015 |
| 3 | एकूण | 632.145 |
गुंतवणूक पार्टनर चा प्रकल्पामधील गुंतवणूक 63% प्रमाणे वाट्यावर येणारी बँक मार्जिन रक्कम
| # | विवरण | गुंतवणूक रक्कम |
|---|---|---|
| # | बँक मार्जिन रक्कम (30%) | 322.9065 |
| 1 | बँक कर्ज रक्कम | 753.4485 |
| 2 | एकूण | 1076.355 |
| विवरण | मासिक पगार | संख्या | एकूण वार्षिक पगार |
|---|---|---|---|
| व्यवस्थापक | 25000 | 2 | 600000 |
| हिशोबनीस | 12000 | 4 | 576000 |
| मदतनीस | 8000 | 10 | 960000 |
| एकूण | 2136000 |
| प्रति विहीर अधिभार | कालावधी (वर्ष ) | परतफेड हफ्ता (वार्षिक ) | मुद्दल रक्कम | व्याज | कर्ज रक्कम |
|---|---|---|---|---|---|
| 0 | 3986.5 | ||||
| 0.6566 | 1 | 558.11 | 398.65 | 159.46 | 3986.5 |
| 0.6566 | 2 | 558.11 | 414.596 | 143.514 | 3587.85 |
| 0.6566 | 3 | 558.11 | 431.179 | 126.930 | 3173.254 |
| 0.6566 | 4 | 558.11 | 448.427 | 109.682 | 2742.074 |
| 0.6566 | 5 | 558.11 | 466.364 | 91.7458 | 2293.6471 |
| 0.6566 | 6 | 558.11 | 485.0186 | 73.091 | 1827.283 |
| 0.6566 | 7 | 558.11 | 504.419 | 53.690 | 1342.264 |
| 0.6566 | 8 | 558.11 | 524.596 | 33.513 | 837.844 |
| 0.3685 | 9 | 313.248 | 313.248 | 0 | 313.248 |
| 0.56213 | 10 | 4778.128 | 3986.5 | 791.628 | 0 |
| # | विवरण | रक्कम |
|---|---|---|
| 1 | विहिरीपासून मिळणारे अधिभार उत्पन्न | 120000 |
| 2 | प्रतिएकर प्रति महिना १ विहिरीपासून मिळणारे अधिभार | 500 |
| 3 | वार्षिक अधिभार | 120000 |
| 4 | एकूण मुद्दल +व्याज रक्कम अधिभार सरासरी | 56213 |
| 5 | व्यवस्थापन खर्च | 2512.941 |
| 7 | वार्षिक विदुयत बिल | 2500 |
| 8 | किरकोळ स्टेशनरी खर्च | 5000 |
| 9 | एकूण खर्च | 66225 |
| 10 | एकूण अधिभार उत्पन्न | 120000 |
| 11 | एकूण खर्च | 66225 |
| 12 | एकूण नफा | 53775 |
| 13 | फार्मर नेटवर्क ला मिळू शकणारे उत्पन्न ३७% | 19896 |
| 14 | गुंतवणूक पार्टनर ला मिळू शकणारे उत्पन्न ६३% | 33878.25 |
१) प्रकल्प किमान गुंतवणूक दारांना १८% परतावा देऊ शकतो .
२) नेटवर्क मुळे पाणी उपलब्धता राहू शकते आणि गुंतवणूक हि डेड आहे असून उत्पन्न देणारी असल्यामुळे गुंतवणूक धोका ०%
३) वार्षिक रक्कम प्रकल्प उभारणी झाल्यावर ठेव स्वरूपात मिळणार असल्यामुळे व्याज हफ्ता नियमित राहू शकणार आहे .