शेतकरी मित्र-पीकदर्जा

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत फार्मर नेटवर्क नि उभारलेल्या संकलन केंद्रात "शेतकरीमित्र -पीक दर्जा "म्हणून गावातील प्रतिनिधी ची निवड केली जाणार आहे . हि निवड पगारतत्वा केली जाणार आहे . .

शेतकरी मित्र-पीकदर्जा

फार्मर नेटवर्क संचलित "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "अंतर्गत संकलन केंद्रावरील आलेला शेतमालाचा दर्जा ठरविण्यासाठी त्याचे अचूक वजन आणि त्याची पँकिंग नीट आणि जागतिक दर्जाची होण्यासाठी "शेतकरी मित्र-शेतमाल दर्जा " हि संकल्पना राबविली जाणार आहे . या संकल्पना अंतर्गत होतकरू कृषी पदवीधर तरुणाची निवड केली जाणार आहे .

निवड व पात्रता कामाची जबाबदारी

१) १० गावातील संकलन केंद्रावर येणाऱ्या शेतमालाचे नियोजन मशिनरी ची उपलब्धता पाहता नियोजन करणे
२) अल्प भूधारक शेतकऱ्याच्या नियोजनानुसार त्यांना इंधन खर्चावर मशिनरी उपलब्धता करण्याकरिता सर्व कामकाजाचे डिजिटल नियोजन करणे .
३) बियाणे दर्जा ,उत्पादकता याची माहिती शेतकऱ्याकडून घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे टप्प्यानीहाय फोटो वेबसाइट वर अपलोड करणे .
४) शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन मिळण्याकरिता वेबिनार आयोजित करणे .
५) पिकाचा दर्जा उच्च राहण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे .
६) शेतकयांना फार्मर नेटवर्क राबविणार असलेल्या प्रकल्प बाबत माहिती देणे आणि त्या मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे .
७) शासनाकडून आणि विमा कंपनीकडून मिळू शकणाऱ्या नुकसान भरपाईबाबत शासनाच्या लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे .
८) विमा कंपनीकडून नाकारल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई बाबत असलेल्या कारणांची मीमांसा करून भविष्यात परत घडू न देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे .
९) विमा कंपनीकडून नाकारल्या जाणारे दावे याची यादी करून ती कंपनीकडे पाठविणे .
१०) बियाणे उगवण क्षमता प्रत्यक्षात शेतकरी निहाय नेमकी किती टक्के आहे याचा अभ्यास आणि निरीक्षण करणे आणि ती माहिती फार्मर नेटवर्क कडे पाठविणे .
११) लागवड ते काढणी याचा खर्च कमीत कमी कसा राहील आणि तो आणखी कमी कसा होईल याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणे ..

नियम आणि अटी

१) शेतकरी मित्र हा त्या १० गावातील रहिवासी असणे बंधनकारक आहे .
२) आंदोलन अथवा राजकारणाच्या संबंधित कार्यप्रणाली ,विचार नसणे गरजेचे आहे .
३) शेतकरी मित्र हा गावकीच्या भावकीच्या राजकारण संबधी माहिती असणे गरजेचे असणारा आहे .
४) शेतकरी मित्राला प्रत्येक पिकाच्या दर्जाबाबत प्रमाणीकरण करणे गरजेचे असणार आहे . चुकीची दर्जाबाबत तक्रार खरेदीदार कडून आल्यास प्रत्यक्षात तोच जबाबदार असणार आहे . दर्जाबाबत होणारे नुकसान हे विश्वास कमी होऊ शकणार आहे त्या मुळे कोणताही दबाव न घेता काम करणे गरजेचे आहे .
५) वेळोवेळी कंपनीच्या वाढीसोबत कामाची जबाबदारी आणि नवीन तंत्र शिकण्याची वृत्ती असणारा असणे गरजेचे आहे.

लागणारी कागतपत्रे .

१) शेतकरी मित्राला एक फिक्स पगार किंवा मानधन असणार आहे . ते नेमकी किती असू शकेल हे तो किती योग्य आणि कामाची जबाबदारी किती पेलतो या वर अवलंबुन असणार आहे
नोंदणी करताना लागणारी कागतपत्रे :
१) फोटो
२) शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे
३) ओळख आणि रहिवासी पुरावा (आधारकार्ड )