फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी मित्र (इ -विक्री नियोजन ) हि संकल्पना राबविल्या जाणार आहे . या संकल्पने अंतर्गत फार्मर नेटवर्क संकलन केंद्र च्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या १० गावातील शेतकऱ्याचा शेतमाल हा -इ -विक्रीद्वारे विकण्याचे नियोजन करण्यासाठी शेतकरी मित्राची नेमणूक केली जाणार आहे .
कामाचे स्वरूप आणि पात्रता : बघायला गेले तर हि संकल्पना नवीन नाही आहे आज हि आडत्याचा प्रतिनिधी म्हणून गावातील कोणी तरी अप्रत्यक्षात काम करीत आहेच .फक्त फरक एवढाच आहे कि हा शेतकरी मित्र डिजिटल प्लॅटफॉर्म वर कामकाज करणारा असणार आहे . त्याचे कामकाज स्वरूप खालीलप्रमाणे
१) शेतकऱ्याना संकलन केंद्रावर शेतमाल विक्री साठी आणण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे .
२) शेतकऱ्याचा शेतमाल हा त्या शेतमालाचा शेवटचा ग्राहक कोण आहे आणि त्यांनी दिलेला भाव हा शेतकऱ्याला मिळणार आहे हि संकल्पना शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करणे .
३) त्याच्या शेतमालाचे मशिनरी उपलब्धता बघून वाहतूक नियोजन करणे .
४) संकलन केंद्रावरील लिलाव दर आणि मार्केट मध्ये मिळणार भाव या संबधी माहिती देणे .
५) लिलाव दर मान्य नसेल आणि पेशाची अडचण आहे हि बाब लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्याला बँकेकडून कर्ज मिळवून देणे .
६) दर्जा ठरविताना संबंधित शेतकरी उपलब्ध नसेल तर त्याचा प्रतिनिधी म्हणून काम करणे
७) लिलाव दर मान्य असेल तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाचा पेसा हा त्याच्या खात्यात मिळेपर्यंत जबाबदारीने काम करणे .
८) फार्मर नेटवर्क शेतमालाची खरेदी करत नसणार आहे . तेव्हा शेतमालाचा पेसा हा खरेदी दाराकडून मिळणार आहे .तेव्हा पैसा मिळेपर्यंत शेतमालाचा ताबा हा त्याच्याकडे असणार आहे . पैसा मिळाला याची खात्री शेतकऱ्याकडून झाल्यावर त्याच्या कडून शेतमालाचा ताबा हा कागदोपत्री संकलन केंद्राकडे देणे बंधनकारक असणार आहे .
९) खरेदी दाराला लागणारे बिल ,खरेदी दाराकडून मिळू शकणारी खरेदीकरार (po ) याचे कामकाज शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकरी मित्राला कामकाज करावयाचे आहे .
१०) खरेदी दाराला शेतमाल पोहचुन देण्यासाठी आवश्यक असणारी वाहतूक व्यवस्था चे नियोजन गरज असल्यास करणे गरजेचे असणार आहे .त्या करिता खरेदीदाराच्या संपर्कात असणे गरजे चे असणार आहे
१) शेतकरी मित्राला एक फिक्स पगार किंवा मानधन असणार आहे . ते नेमकी किती असू शकेल हे तो किती योग्य आणि कामाची जबाबदारी किती पेलतो या वर अवलंबुन असणार आहे